Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुहात आमदार अबू आझमींना गावकर्‍यांचा विरोध

पोलिसांनी संगमनेरमध्येच अडवले

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये पुजार्‍यास झालेल्या मारहाण प्रकरणानंतर दोन समाजात तेढ निर्माण होऊन हाणामारीची घटना घडली होती.

राऊत दाम्पत्याच्या अमृतमहोत्सवाला हजारोंची गर्दी
सिव्हिल’मधील आगीच्या घटनेचा तपास झाला ठप्प
श्रीगोंदा शहरात अवैध बार गुटखासह व्यवसाय जोमात

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये पुजार्‍यास झालेल्या मारहाण प्रकरणानंतर दोन समाजात तेढ निर्माण होऊन हाणामारीची घटना घडली होती. सदर घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आमदार अबू आझमी काल येथील कुटुंबीयास भेट देण्यासाठी येणार होते. मात्र गावकर्‍यांनी एकत्र येत अबू आझमीला येथे येण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.
 मनमाड महामार्गालगत असलेल्या गुहा गावच्या वेशी जवळ 400 ते 500 तरुणांनी एकत्र येत अबू आजमी च्या या दौर्‍याला तीव्र विरोध दर्शवला. अबू आदमीला गावात प्रवेश करू देणार नाही अशी भूमिका या तरुणांनी घेतल्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान अबू आजमीला संगमनेर येथे पोलिसांनी अडवले असून कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून गुहा गावात प्रवेश करू नये अशी विनंती केली तसेच गावकर्‍यांना देखील शांततेचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान गावामध्ये तणाव पूर्व शांतता असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
                    गुहा गावामध्ये पुजार्‍यास झालेल्या मारहाण प्रकरणानंतर दोन समाजात तेढ निर्माण होऊन हाणामारीची घटना घडली होती. दोन्ही समाजाच्या वतीने राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.दोन्ही समाजाच्या 115 लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्या नंतर दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याचे काम पोलिस प्रशासनाच्या वतीने सुरु असुन माञ एका समाजाच्या वतीने काही राजकीय नेते मंडळी यांनी पोलिसांवर आरोप करुन फिर्याद देण्यासाठी आलेल्या लोकांनाच पोलिसांनी अटक केली.राञी उशिरा फिर्याद दाखल करण्यात आली.असा आरोप करण्यात आला.काल समाजवादी पक्षाचे आ.अबू आझमी यांनी गुहा येथिल एका समाजाच्या लोकांना भेटीसाठी येणार असल्याचे समजताच गावकर्‍यांनी गुहा गावाच्या वेशीत ठाण मांडून प्रवेश करू देणार नाही अशी भूमिका या तरुणांनी घेतली होती.

COMMENTS