श्रीगोंदा प्रतिनिधीः कमी प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शेतकर्यांनी उपलब्ध पाण्यावर पेरण्या केल्या आहेत. परंतु पाऊस न आल्याने पिकं सुकू न गेली असु
श्रीगोंदा प्रतिनिधीः कमी प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शेतकर्यांनी उपलब्ध पाण्यावर पेरण्या केल्या आहेत. परंतु पाऊस न आल्याने पिकं सुकू न गेली असुन,ती जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.पाणी वापर संस्था पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार घोड धरणात पाणी पातळी कमी असली तरी वरच्या धरण साखळीतील धरणे 85% च्यावर भरली असल्याचे समजते. सध्या असलेली पिके वाचविण्यासाठी घोडचे आवर्तन तात्काळ सोडण्याची गरज आहे.अन्यथा घोड लाभक्षेत्रातील शेतकरी,ग्रामस्थ व पाणी वापर संस्थानी प्राणांतिक उपोषणाचा इशारा दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाण्याअभावी पिके जळून शेतकरी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.तरी मा.कार्यकारी अभियंता यांनी आवर्तन सोडणेकामी तातडीने निर्णय घ्यावा.अन्यथा आम्ही घोड लाभक्षेत्रातील शेतकरी तहसिल कार्यालयासमोर सोमवार, दि.28 ऑगस्ट पासुन प्राणांतिक उपोषण करणार आहे. मा.कार्यकारी अभियंता,मा.जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा व आ. बबनराव पाचपुते यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहे. या निवेदनावर स.म.शिवाजीराव नागवडे कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन बाबासाहेब इथापे, पाणी वापर संस्थेचे चेअरमन महेंद्र किसन वाळुंज, सरपंच प्रफुल्ल इथापे, प्रहारचे कृष्णा खामकर,अशोक वाळुंज, दिपक नवले, शहाजी इथापे, महेंद्र संपत वाळुंज विठ्ठल वाळुंज, बाळासाहेब घोलप, विलास नवले, सुरेश वाळुंज ,डॉ दत्तात्रय इथापे, संतोष सोनवणे,वैभव वाळुंज यांच्या सह्या आहेत.
COMMENTS