Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विलासराव देशमुख युवा मंचतर्फे मिरवणुकांचे जोरदार स्वागत

लातूर प्रतिनिधी - साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती लातूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्ण

विधानपरिषद सभापतींची निवड याच अधिवेशनात ?
IPL 2023 ने बनवले करोडपती
स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे राज्यभरात पडसाद

लातूर प्रतिनिधी – साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती लातूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने मिरवणुकांचे जोरदार स्वागत करण्यात आले. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांच्या भव्य मिरवणुका सायंकाळी काढण्यात आल्या.
शहराच्या विविध भागांतून निघालेल्या मिरवणुका साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी आल्या तेव्हा विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने या मिरवणुकांचे स्वागत लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी केले. या वेळी कैलास कांबळे, पंडित कावळे, यशपाल कांबळे, विकास कांबळे, प्रा. प्रवीण कांबळे, अकबर माडजे, अ‍ॅड. देविदास बोरूळे-पाटील, अभिषेक पतंगे, अभिषेक इगे, अविनाश बट्टेवार, गलांडे, सुलेखा कारेपूरकर, आसिफ बागवान, भाऊसाहेब भडीकर आदींनीही मिरवणुकांचे स्वागत केले.

COMMENTS