Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आह

विचार आणि जनतेशी बांधिलकी नसलेल्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट!
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना नंदुरबार शहरातील युवकाकडून  विरोध 
एसबीआयच्या व्याजदरात वाढ

ठाणे : ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी 126.602 मीटर टीएसडी हुन जास्त झाली आहे. त्यामुळे लवकरच धरण ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

COMMENTS