Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शंकरनगर येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन

शंकरनगर । प्रतिनिधीसर्वसामान्यांच्या हक्कासाठी झटणारे, कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार

वय झाले, आतातरी थांबणार की नाही ?
पक्ष फोडला आता कंत्राटी भरतीचे पाप करू नका
महाराष्ट्राचे पाणी पळवण्याचा कर्नाटकाचा डाव

शंकरनगर । प्रतिनिधी
सर्वसामान्यांच्या हक्कासाठी झटणारे, कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अचानक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे. त्यांच्या जाण्याने राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देता यावा, या भावनेतून नांदेड शहर, नायगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा तसेच श्री काळेश्वर महादेव मंदिर, विष्णुपुरी या मार्गाने पवित्र अस्थिकलशाचे दर्शन सुरू आहे. या अंतर्गत  पवित्र अस्थिकलश शंकरनगर (ता. बिलोली) येथे आणण्यात आला. यावेळी नागरिकांनी भावपूर्ण दर्शन घेत पूजन केले. जनतेशी नाळ जपणारे नेतृत्व, प्रशासनातील स्पष्टता आणि लोकहितासाठी अखंड धडपड हीच स्व. अजितदादा पवार यांची खरी ओळख होती. त्यांच्या पवित्र स्मृतींना यावेळी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील मान्यवर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार सुभाष साबणे, व्यंकटराव  गोरेगावकर, मीनलताई खतगावकर, शिवराज  होटाळकर, बालाजी  शिंदे, बिराजदार गुरुजी, दुर्गाप्रसाद पांडे, धनंजय शेळके, संतोष पुयड, हणमंत तोडे, शिवाजी देगलूरे, सदाशिव डाकोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS