Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत महावितरण कंपनीने विजेचा प्रश्न तात्काळ सोडवावा

नांदेड प्रतिनिधी - हदगाव हिमायतनगर तालुक्यातील विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, ग्रामीण भागातील वीज हे रात्रीच्या वेळेला गायब होते त

उत्कृष्ट तार मार्ग कर्मचारी म्हणून अरविंद सावते सन्मानीत
पाच जणांसह 190 मेंढ्यांचा मृत्यू
दारुच्या नशेत तरुण थेट रेल्वे रुळावर झोपला

नांदेड प्रतिनिधी – हदगाव हिमायतनगर तालुक्यातील विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, ग्रामीण भागातील वीज हे रात्रीच्या वेळेला गायब होते त्यात उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण,त्रस्त होत आहेत, ग्रामीण भागात अनेक गावात रात्रभर लाईटच नसते,या भागातील नागरिक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे चकरा मारूनही कंपनीचे अधिकारी दाद देत नसल्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत,हदगाव हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील विजेच्या प्रश्नाविषयी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, खा. हेमंत पाटील,बाबुराव कदम कोहलीकर यांच्या माध्यमातून भेट घेऊन हदगाव हिमायतनगर तालुक्यातील विजेचा प्रश्न त्यांच्या कानावर घालून सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती हदगाव विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
उन्हाळ्याचे दिवस त्यात वादळी वार्‍यासह पाऊस यामुळे वातावरणात बदल होऊन सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात साधा वारा आला तरी लाईट जाते, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे, उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत,दुरुस्तीचे कामे पावसाळ्यापूर्वी करायची असतात ती पण अद्याप सुरू केली नाहीत, याबाबत कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता शाखा अभियंता यांनी ही मोहीम राबवून नागरिकांना रात्रीच्या वेळी वीजपुरवढा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजे,परंतु या अधिकार्‍याच्या हलगर्जीमुळे हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांना रात्रीच्या वेळी वीज मिळत नाही, अनेक गावात रात्रभर लाईटच नसल्यामुळे नागरिकांना झोपेअभावी रात्र काढावी लागत आहे,अनेक गावातील नागरिक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात खेटे मारूनही अधिकारी दात देत नसल्यामुळे याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरठा सुरळीत व्हावा यासाठी माजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री सूर्यकांता पाटील, खासदार हेमंत पाटील, बाबूराव कदम कोहळीकर यांच्या माध्यमातून भेट घेऊन दोंन्ही तालुक्यांतील संबंधित अधिकार्‍याची एक बैठक लावून वीजपुरवठा सुरळीत होईल यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती भागवत देवसरकर यांनी दिली आहे.

COMMENTS