Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटणमध्ये ऊसाच्या ट्रॉलीच्या अपघाताची चित्रफीत सोशल मिडियावर व्हायरल

फलटण : डीएड चौक येथे डिव्हायडरला धडकलेली ऊसाची ट्रॉली. डिएड चौक-रिंगरोडसह गर्दीच्या मार्गाने ऊस वाहतूकीस बंदी घालण्याची मागणीफलटण / प्रतिनिधी : दि

आटपाडी तालुक्यातील समन्यायी पाणी वाटपाचे सादरीकरण
राजारामबापू कारखाना हुकुमशाहीचा अड्डा : धैर्यशील मोरे
येवला बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजार समितीत मका खरेदीस सुरुवात (Video)

डिएड चौक-रिंगरोडसह गर्दीच्या मार्गाने ऊस वाहतूकीस बंदी घालण्याची मागणी
फलटण / प्रतिनिधी : दिनांक 8 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या रिंगरोडवरील डीएड चौक येथे ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॉलीमुळे मोठा अपघात होता-होता वाचला. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वच स्तरातून फलटण शहरातून मुख्यतः रिंगरोडवरून होणार्‍या ऊस वाहतुकीस बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
फलटण शहरात वाहतूक समस्या आधीपासून मुख्य समस्या बनली आहे. त्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला की अपघात, वाहतूक कोंडी यांच्या समस्या निर्माण होत आहे. अपुरा रस्ता, पार्किंग व्यवस्था नसणे, अतिक्रमण यामुळे रिंगरोड वरील रस्त्यावर वाहतूक व्यवस्था निर्माण होत आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी याबाबत त्यांच्या कार्यकाळात ऊस वाहतूक संबंधी काही नियम व मार्ग निश्‍चित केले होते. परंतू यानंतर यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याकडून करण्यात आली नाही. यामुळे फलटण तालुक्यातील ऊस वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.
दि. 8 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शहरातील नेहमीच्या वर्दळीच्या रिंगरोडवरील डीएड चौक येथे ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॉलीचा खोबळा मोडल्याने उतारावरून ऊसाने भरलेली ट्रॉली उलटी सुसाट मागे गेली. रोड डिव्हायडरला जाऊन ही ट्रॉली आदळली. यावेळी उपस्थित नागरिकांनी आरडा-ओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला. काही वेळेत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्व स्तरातून फलटण शहरातून मुख्यतः रिंगरोडवरून होणार्‍या ऊस वाहतुकीस बंदी घालण्याची मागणी होवू लागली तर काहींनी रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करण्यात परवानगी द्यावी. दिवसा बंदी घालावी मागणी केली. काहींनी ऊस वाहतूक इतर मार्गानी वळवावी, अशी मागणी केली आहे. शहरात ऊस वाहतूक करणार्‍या गाड्या उभ्या करण्यास बंदी करावी. यासारखे निर्णय घेऊन भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.
ऊस वाहतुक पार्श्‍वभूमीवर वाहतूक शाखेने गळीत हंगामासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूर व इचलकरंजी या ठिकाणी ऊस वाहतुकीकरीता राबवलेले पॅटर्न फलटण शहरात लागू लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ऊस वाहन चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेफामपणे ऊस वाहतूक करतात. ऊस वाहतूक करणार्‍या वाहन चालकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जाते.
ऊस वाहतूक करताना अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याकडे संबंधित कारखाना प्रशासन, पोलीस खाते आणि परिवहन अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले आहे. ऊस वाहतूक करणारे वाहन वाहनाच्या माल वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून वाहतूक करतात. मुख्य वाहतूक असणार्‍या वाहन चालक अतिशय धोकादायक पध्दतीने वाहन चालवितात. या वाहनांना पाठीमागे कुठल्याही प्रकारची सुरक्षेबाबत काळजी घेतली जात नाही.
ट्रॅक्टर चालक दोन ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करतात. ट्रॅक्टरला ट्रेलरच्या ऐवजी जुगाड वापरतात. वाहन चालक शहरात अनेक गर्दीच्या ठिकाणी वाहन थांबविताना रस्त्याच्या मध्येच वाहन थांबवितात. त्यामुळे अपघाताला आयतेच निमंत्रण मिळते. अनेक वाहन चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. काही वाहनांवर तर अल्पवयीन असल्याचे आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी ही वाहने रस्त्याच्यामध्ये उभी करताना सुरक्षेबाबत कसलीही काळजी घेतली जात नाही. ऊस वाहतूक करताना वाहन चालक अतिशय मोठ्या आवाजात गाण्याचा आवाज करून वाहन चालवितात. त्यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होतात. या त्रुटींकडे संबंधितांचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. अशा अनेक प्रकारे हे वाहन चालक नियम पायदळी तुडवून वाहन चालवितात. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत.
ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिफ्लेक्टर, रेडियम तसेच टेल लॅम्प नसल्याने रात्री अनेक वाहन चालकांना पुढे ऊस वाहतूक करणारे वाहन आहे, याचा अंदाज येत नाही. म्हणून अपघात होत आहेत. तसेच रस्त्याच्या मध्येच हे वाहन उभे असतात व त्यांना रिफ्लेक्टर, रेडियम तसेच टेल लॅम्प नसल्याने अपघात घडत आहेत. ऊस वाहतूक करणार्‍या चालकांना संबंधितांनी तंबी देऊन वाहतूक नियमांचे धडे देण्याची व वाहतुक मार्ग तसेच वाहतूक वेळा तयार करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS