Homeताज्या बातम्यामनोरंजन

जेष्ठ मल्याळम अभिनेते इनोसेंट यांचे निधन

वयाच्या ७५व्या घेतला अखेरचा श्वास

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार इनोसंट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेत

कराड अर्बन बँकेचा 105 वा वर्धापनदिन उत्साहात
पीएमपीची दोन नव्या मार्गावर सेवा सुरू
साकळाई’ साठी शेतकर्‍यांनी अडवला नगर-दौंड महामार्ग

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार इनोसंट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इनोसंट यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीला मोठा धक्काच बसला आहे. इनोसंट यांच्या निधनानंतर रुग्णालयाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात, श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे इनोसंट यांना ३ मार्च रोजी कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला असे म्हटले आहे. पुढे या पत्रकात इनोसंट यांच्या घशात संसर्ग झाला होता, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र इनोसंट यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

COMMENTS