Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे आज मुंबईत वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील

आ. राहुल कुल यांना आरोग्यसेवेचा आशीर्वाद ; कोविड काळातील काम आजही स्थानिकांच्या लक्षात
कर्ज महागले ; रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात वाढ
’गो फर्स्ट’ ची एनसीएलटीकडे याचिका

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे आज मुंबईत वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील ज्युपिटर अपार्टमेंट येथे दुपारी २ वाजता त्यांचे शव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा स्मशानभूमीत सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देव कोहली यांनी मैंने प्यार किया, बाजीगर, जुडवा २, मुसाफिर,शूट आऊट लोखंडवाला,टॅक्सी नंबर ९११ यांसारख्या १०० हुन अधिक चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. त्यांनी अनु मलिक, राम लक्ष्मण, आनंद राज आनंद यांसारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांसोबत अनेक हिट गाणी दिली आहेत.

COMMENTS