Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजीपाला महागला; टोमॅटोचे दर शंभरी पार

लातूर प्रतिनिधी - शहरातील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये दररोज हजारो क्विंटल भाजीपाल्याची उलाढाल होत असते. सर्वांसाठी लागणारा भाजीपाला आता चांग

थोरात कारखान्याकडून शेतकर्‍यांना 200 रुपये प्रतिटन अनुदान व कामगारांना 20 टक्के बोनस
कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली
निसर्गानुभव कार्यक्रमात निसर्गप्रेमींना 374 वन्यप्राण्यांचे दर्शन

लातूर प्रतिनिधी – शहरातील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये दररोज हजारो क्विंटल भाजीपाल्याची उलाढाल होत असते. सर्वांसाठी लागणारा भाजीपाला आता चांगलाच भाव खात आहे. काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. त्यातच बाहेरून येणारी भाजीपाल्याची आवक शहरातील महात्मा फुले मार्केट कमी झाली आहे. बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात आले मात्र मागणी वाढली आहे त्यामुळे ही दरवाढ आली आहे. टोमॅटोची चढ्या दराने विक्री केली जात आहे. टोमॅटोने शंभरी पार केली आहे.
उष्णता आणि अवकाळी पाऊस यामुळे टोमॅटोचं मोठं नुकसान झालं आहे. टोमॅटोची आवक कमी झाल्याने भाव वाढल्याचं किरकोळ विक्रेत्यांनी सांगितलं आहे. सध्या सर्वच पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. टोमॅटोबरोबरच काही भाज्यांचे दरही झपाट्याने वाढले आहेत. कडक उष्मा, कमी उत्पादन आणि उशिरा झालेला पाऊस यामुळे टोमॅटोचे किरकोळ भाव आता 120 रुपये किलोवर पोहोचले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना ते परवडत नाहीत. नॉनव्हेज असो किंवा व्हेज भाज्यांमध्ये किंवा आमटीमध्ये सर्रास वापरला जातो तो टोमॅटो. थोडासा आंबटपणा आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी टोमॅटो वापरला जातो. बाजारात आता 10 ते 20 रुपयांना मिळणारा टोमॅटो 120 रुपयांना मिळत आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने खिशाला कात्री लागणार आहे. जवळपास काही दिवस असेच भाव चढेच राहतील, अशी शक्यता असल्याचे विक्रत्याने म्हणले आहे. बाजारात टॉमेटोची नवीन आवक आल्यावर भाव खाली येण्याची अपेक्षा आहे मात्र आता ज्या शेतक-यांकडे टॉमेटो आहे त्यांची मात्र दिवाळी सुरू आहे, असे किरकोळ विक्रेत्याने सांगीतले. घरगुती उपकरणे, मोबाईल फोन, एलईडी, फ्रिज, यूपीएस, वॉशिंग मशिनसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार आहेत मात्र जीवनावश्यक वस्तू सामान्यांच्या आवाक्या बाहेर जात आहेत. तूर डाळीने महागाईचा उच्चांक गाठला आहे त्यामुळे सामान्यांच्या जेवणाच्या ताटातून वरण गायब झाले आहे. स्वयंपाकाचा गॅस हजार रुपयांच्या वर गेला आहे. मे महिन्यात जवळपास सर्वच प्रकारचा भाजीपाला काही प्रमाणात स्वस्त होता. जून महिन्यात भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. मेथी, शेपू, पालक, चुका, अंबाडी, गवार, शेवगा, चवळी, वांगे, बटाटे, कारले, भोपळा, दोडका, काकडी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबू या सर्वच भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत मे महिन्यात टोमॅटोचे दर बाजारात 3 रुपये किलो आणि किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपये किलो होते. जूनमध्ये त्यात अचानक वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 100 ते 120 रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. सॅलडपासून ते जेवणात अगदी काही ठिकाणी नाश्त्यासाठीदेखील टोमॅटोचा वापर केला जातो. हे दर आता 100 रुपयांच्या वर गेले आहेत. लवकर पाऊस न पडल्याने हा परिणाम झाला आहे. टोमॅटोचे भाव गेल्या आठवड्यात तिपटीने वाढले आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून टोमॅटोचा पुरवठा कमी असल्याने बेंगळुरू येथून काही प्रमाणात टोमॅटोची आवक होत आहे तर काही प्रमाणात ग्रामीण भागातून आवक होत आहे.

COMMENTS