Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरकोळ बाजारात भाजीपाला महागला

लातूर प्रतिनिधी - सर्वत्र लग्नसराईची मोठी धुमधाम सुरु आहे. त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ठोक बाजाराच्या तुलन

टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार ?
कोल्हापुरात 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
शासनाच्या नवीन वाळू धोरणामुळे अवैध वाळू विक्रीला बसणार आळा

लातूर प्रतिनिधी – सर्वत्र लग्नसराईची मोठी धुमधाम सुरु आहे. त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ठोक बाजाराच्या तुलनेत किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव तिप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तर ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलसाठे तुडूंब भरले. परंतु, सूर्यनारायण कोपल्याने उन्हाचे चटके जाणवत आहेत. परिणामी, जलसाठे आटून कोरडेठाक पडले आहेत. तसेच विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. काही ठिकाणच्या विंधनविहिरी बंद पडल्या आहेत. यंदा लग्नसराईमुळे भाजीपाल्याला मोठी मागणी आहे.
जिल्ह्यातील काही शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात. उन्हाळ्यात भाजीपाल्यास अधिक मागणी असते. शिवाय भावही चागंला मिळतो. यंदा कडक उन्हाळा असल्याने जलसाठे कोरडे पडत असल्याने भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाल्याची आवक घडली असल्याचे व्यापा-यांनी सांगीतले. उन्हाळा संपला. पावसाळा सुरु झाला असला तरी उन्ह कायम आहे. त्यामुळे आजही लिंबांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणीच्या तुलनेत लिंबांची आवक कमी आहे. परिणामी हिरव्या लिंबालाही ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. ठोक बाजारात लिंबास 30 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. मात्र किरकोळ बाजारात 60 रुपयांंपर्यत भाव असल्याचे विक्रेत्यांनी सांगीतले.

COMMENTS