Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंत मोरे यांनी हाती बांधले शिवबंधन

मुंबई : मनसेला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा लढवणारे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी अधिकृतरित्या माजी मुख्यमंत्री उद्धव

वसंत मोरेंचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र
मी परतीचे दोर स्वत कापले- वसंत मोरे
वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

मुंबई : मनसेला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा लढवणारे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी अधिकृतरित्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत आणि मनसेतून त्यांच्यासोबत शिवसेनेत आलेल्या पदाधिकार्‍यांसमवेत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले.
यावेळी, बर्‍याच दिवसांनी पाऊस आला, आणि पावसासोबत वसंतही आला, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरेंचे स्वागत केले. तर, उद्धव ठाकरेंनीही वसंत मोरेंचे पक्षात स्वागत करताना, तुम्ही सर्वजण जुने शिवसैनिक आहात, तुमचा पक्षात प्रवेश नसून स्वगृही परतत आहात. मात्र, तुम्हाला शिवसेना सोडल्याची शिक्षा द्यायला हवी, असे म्हणत आता पुण्यात शिवसेना आणखी वाढवा, हीच जबाबदारी मी देत असल्याचे म्हटले. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्याहस्ते वसंत मोरेंसह त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधले. यावेळी, शिवसेना नेते संजय राऊत, आमदार सचिन अहीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी, भाषण करताना वसंत मोरेंनी आता पुन्हा शिवसेनेत परत आलो असून हा पक्षप्रवेश नसून आपल्याच पक्षात घरवापसी करत असल्याचे म्हटले. उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात बोलताना वसंत मोरेंना चिमटा काढला. शिवसेना सोडून दुसर्‍या पक्षात गेल्यानंतर काय मान-सन्मान मिळतो, कसा अपमान केला जातो, असे म्हणत मनसेकडून देण्यात आलेल्या वागणूकीवरुन अप्रत्यक्षपणे टोला लगावला. शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर मिळालयाच हवी, ती वसंत मोरेंनाही मिळायला पाहिजे. मी वसंत मोरेंसह तुम्हालाही शिक्षा देत आहे, मला पूर्वीपेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना पुण्यात शिवसेना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.

COMMENTS