Vasai : वसईत पोलिसांची दादागिरी दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Vasai : वसईत पोलिसांची दादागिरी दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण (Video)

वसईत साध्या वेशातील पोलिसांची दादागिरी समोर आली आहे. दुकानासमोर भांडण करणाऱ्या फेरीवाल्यांना जाब विचारणाऱ्या एका कापड  व्यापाऱ्याला दुकानात शिरुन एका

राज कुंद्राची 97 कोटींची मालमत्ता जप्त
आसाममधील गुवाहाटी मध्ये रस्ता अपघातात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू
ओबीसींच्या आरक्षणासाठी सर्वांनी एका छताखाली येण्याची गरज : पद्माकांत कुदळे

वसईत साध्या वेशातील पोलिसांची दादागिरी समोर आली आहे. दुकानासमोर भांडण करणाऱ्या फेरीवाल्यांना जाब विचारणाऱ्या एका कापड  व्यापाऱ्याला दुकानात शिरुन एका पोलिसाने धक्काबुक्कीकरुन, व बुक्याने मारहाण केली असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मारहाणीत पोलिसाची पत्नी आणि मित्राचा ही समावेश असल्याचे पोलीस तक्रारीत उघड झाले आहे.ही घटना 17 ऑक्टोबर रोजी  घडली आहे. याबाबत मारहाण करणारा पोलीस, त्याची पत्नी आणि त्याच्या एका मित्रावर माणिकपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेने व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

COMMENTS