Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरकुटेच्या मुली सलग दुसर्‍यांदा कबड्डीत राज्यात अव्वल; चार मुलींची राज्याच्या संघात निवड

गोंदावले / वार्ताहर : शंभु महादेव हायस्कूल वरकुटेच्या 14 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने राज्य पातळीवर अव्वल स्थान मिळवले आहे. तर चार मुलींच

बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी एकास 20 वर्षाची सक्त मजूरी
गोरगरीब महीलांची फसवणुक करणाऱ्या आरोपीस दौंड पोलिसांनी केले जेरबंद l LokNews24
उर्दू शाळेत पालकमंत्र्यांनी दिलेल्या निधीत अपहार; उर्दू हायस्कूल बचाव कृती समितीचा आरोप

गोंदावले / वार्ताहर : शंभु महादेव हायस्कूल वरकुटेच्या 14 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने राज्य पातळीवर अव्वल स्थान मिळवले आहे. तर चार मुलींची राज्याच्या संघात निवड करण्यात आली आहे. खेड पुणे येथे झालेल्या राज्य पातळीवरील कबड्डी स्पर्धेत वरकुटेच्या मुलींनी लातूर व नागपूर विभागाला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. आंतिम सामना यजमान पुणे विभागाशी झाला. आपल्या सांघिक कौशल्यावर रोमहर्षक विजय मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
या संघातील खेळाडू मुलींची नावे भूमिका माने, ध्रुवीता माने, मृदुला मोहिते, आरती खांडेकर, पौर्णिमा माने, साक्षी जाधव, दिक्षा जाधव, चेतना विरकर, माधुरी तुपे, ज्ञानेश्‍वरी सुळ, स्वराली पांढरे, खुशी सुळ अशी आहेत. या मुलींना भगवान दोलताडे, शिवाजी माने, शरद जाधव, राम साठे यांनी मार्गदर्शन केले.
या संघातील भूमिका माने, ध्रुवीता माने, मृदुला मोहिते, आरती खांडेकर यांची निवड राज्याच्या संघात करण्यात आली आहे. हे सामने पाहण्यासाठी व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वरकुटे येथून अनेक कबड्डीप्रेमी खेड येथे गेले होते. सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सातारा जिल्हा खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष श्रीराम पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, प्रा. अजित काटकर, सरपंच मारुती मोटे, वाकीचे सरपंच अभिजित माने, उपसरपंच नारायण जाधव, हनुमान मंडळाचे अध्यक्ष सुभाष माने,पालक संघाचे सुभाष जाधव, मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव व त्यांचे सहकारी यांच्यासह सर्व युवा मंडळांचे अध्यक्ष व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS