Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाण्यासाठी वणवण..

पिंपरनई गावच्या जनावरांना बेलगावच्या भोनाई तलावाचा आधार-डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - ऊन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत असुन गावतलावातील पाण्याची पातळी खालावली असुन जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गाव सोडून शेजार गा

राहुरी शहरात वाढले डासांचे साम्राज्य
ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवादासाठी आमदार तांबेंची निवड
Nanded : अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन (Video)

बीड प्रतिनिधी – ऊन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत असुन गावतलावातील पाण्याची पातळी खालावली असुन जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गाव सोडून शेजार गावच्या शिवारातील साठवण तलावावर जनावरांची तहान भागवावी लागत असून अजुन एप्रिल-जुनचा उन्हाळा आणखी कडक जाणार असल्याने पशुपालक चिंतेत आहेत.
बीड तालुक्यातील मौजे.पिपरनई येथील  रामराव वायभट यांच्या 50 शेळ्या तसेच ईतर म्हशी, गाय-बैल, यांना पिंपरनई येथील तलाव आडवळणी असल्या कारणाने बेलगाव शिवारातील बेलेश्वर मंदिर परीसरातील भोनाई तलावाचा आसरा घ्यावा लागत आहे. हिंदी महासागरात निर्माण झालेल्या अल-निनो प्रभाव मान्सुनवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन त्या अनुषंगानेच आगामी काळात पाणीटंचाई जाणवु नये यासाठी जिल्हाप्रशासनाने निवासी उपजिल्हाधिकारी बीड पाणीटंचाई विभाग संतोष राऊत यांच्या आदेशाने पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणी विद्युत  मोटारी व अन्य साधनाद्वारे करण्यात येणारा अवैध पाणीउपसा रोखण्याकरीता तात्काळ संबधित पाटबंधारे विभाग आधिकारी,कर्मचारी,गटविकास आधिकारी कार्यालयातील कर्मचारी, व महावितरणचे कर्मचारी यांची संयुक्त पथके सर्व तहसिलदार यांनी स्थापित करून अवैध पाणी उपस्यावर प्रतिबंध  घालण्यात यावा आणि तसा अहवाल कार्यालयास सादर करण्यात यावा म्हटले आहे परंतु केवळ कागदोपत्रीच उपाययोजना राबविण्यात येत असून हितसंबंध जोपासत जिल्हाप्रशासनाची खोटा अहवाल सादर करून दिशाभूल करत आहेत. त्यामुळेच कठोर पणे उपाययोजना करण्यात यावी.

COMMENTS