मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यशस्वी चाचणी देखील आली. सध्या म
मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यशस्वी चाचणी देखील आली. सध्या मुंबई ते शिर्डी धावणार्या गाडीचा वापर चाचणीसाठी करण्यात आला. मुंबईहून पहाटे 5.35 वाजता गोव्याच्या दिशेने वंदे भारत एक्सप्रेस रवाना झाली. 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून सुटली, ही गाडी गोव्यातील मडगावला दुपारी 2.30 दरम्यान पोहोचली. वंदे भारत एक्सप्रेसला मिळणारा प्रतिसाद पाहून मुंबई-गोवा मार्गावर देखील ही एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. मुंबईहून सुटणार्या वंदे भारतचा हा चौथा मार्ग असणार आहे.
COMMENTS