Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरसेविका वंदना टेकेंच्या अपात्रतेची सुनावणी २० तारखेला

पाथर्डी : पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीकडून निवडून आलेल्या मात्र त्या नंतर झालेल्या  गटनोंदणीत भाजपच्या गटात सहभागी झालेल्या न

 स्व.अजित पवारांच्या स्मारकासाठी पालिकेने जागा द्यावी : भापकर
महात्मा गांधी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
बाबुजी आव्हाड महाविद्यालयात विद्यार्थी सहभाग परिसंवाद उत्साहात  

पाथर्डी : पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीकडून निवडून आलेल्या मात्र त्या नंतर झालेल्या  गटनोंदणीत भाजपच्या गटात सहभागी झालेल्या नगरसेविका वंदना टेके यांना अपात्र करावे यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीत कोणतेही कामकाज न होता या विषयावर पुढील २० तारखेला संबंधितांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले.

पालिका निवडणुकीत टेके या विजयी झाल्या. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार गटात स्वतःची नोंदणी न करता त्या भाजपच्या गटात सहभागी झाल्या तर या नंतर झालेल्या विविध विषय समित्यांच्या निवडीत त्यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुद्धा निवड करण्यात आली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडून आल्यावर  टेके यांनी भाजपची साथ धरल्याने त्यांना अपात्र करावे असा अर्ज नगरसेवक देवा पवार व योगेश रासने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सह आयुक्त अभिजित हराळे यांनी या विषयावर शुक्रवारी सुनावणी ठेवत या सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश टेके,पवार,रासने यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना बजावले होते.

 झालेल्या सुनावणीस पवार वगळता इतर सर्व जण उपस्थित राहिले. या वेळी टेके यांच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी या संदर्भात दाखल झालेली कागदपत्रे मिळावीत अशी मागणी केली तर हराळे यांनी या विषयावरील पुढील कामकाज येत्या २० ला  होणार असल्याचे सांगितले.

COMMENTS