मुंबई/प्रतिनिधी ः वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत दुसर्या टप्प्यातील चर्चा सोमवारी पार पडली असून, कोणत्याही पक्षाला अंधारात ठेवून ही चर्चा चालल
मुंबई/प्रतिनिधी ः वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत दुसर्या टप्प्यातील चर्चा सोमवारी पार पडली असून, कोणत्याही पक्षाला अंधारात ठेवून ही चर्चा चाललेली नाही. तसेच कोणाचाही वंचितला सोबत घेण्यासंदर्भात विरोध नाही. महाविकास आघाडीसोबत लवकरच वंचित बहुजन आघाडी दिसणार, असल्याचे भाष्य सुभाष देसाई यांनी केले आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्र येण्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली होती. त्यानंतर त्यांचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे नेते यांच्यामध्ये बैठका होत आहेत. पुढची वाटचाल अधिक भक्कमपणे व्हावी कुठली शंका राहू नये यासाठी या बैठका महत्त्वाच्या आहेत. चर्चांचे टप्पे महत्त्वाचे आहेत. वंचित बहुजन आघाडीबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी कोणाचाच विरोध नाही. मला जी माहिती आहे त्यामध्ये मी सांगू शकतो आणि चर्चेतूनच पुढे जाऊ शकतो, असे देसाई म्हणाले. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना आम्ही वंचितसोबत चर्चा करत आहोत याची कल्पना आहे. कोणालाही वंचितला सोबत घेताना अंधारात ठेवलेले नाही. महाविकास आघाडीमध्ये अनेक संघटना येतात आणि हा प्रवाह अधिक मोठा होत जातो. महाविकास आघाडीमध्ये नक्कीच वंचित बहुजन आघाडी सुद्धा लवकरच पाहायला मिळेल, असे देखील सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.
COMMENTS