वंचित बहुजन आघाडीला मोठे खिंडार.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीला मोठे खिंडार.

ऊसतोड मजूर प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांचा वंचितला रामराम पक्षातील बडव्यांमुळे त्रस्त झाल्याचा आरोप

बीड प्रतिनिधी- वंचित बहुजन आघाडीला एक मोठा धक्का बसला आहे. ऊसतोड मजूर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर(Shivraj Bangar) यांनी वंचित बहुजन आघाडीला स

वाळू भरून जाणार्‍या हायवे टिप्परवर धाडसी पोलिसांची कारवाई
गदर-2 मधील ‘उड जा काले कावा’ गाण्याचं नवे व्हर्जन रिलीज
राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बीड प्रतिनिधी- वंचित बहुजन आघाडीला एक मोठा धक्का बसला आहे. ऊसतोड मजूर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर(Shivraj Bangar) यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षातील अनेक जण त्रास देत आहे. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे. माझे वैर विठ्ठलाशी नाही मात्र मी पक्षातील बडव्यांमुळे त्रस्त झालो आहे. म्हणून मी वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शिवराज बांगर यांनी दिली. आज ते मुंबईत मनसेत जाहीर प्रवेश करीत आहेत. 

COMMENTS