Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्र न्यायालयातही डॉ. भास्कर मोरेचा जामीन फेटाळला

आणखी 10 मुलींची तक्रार ; मोरेचा कोठडीतील मुक्काम वाढला

जामखेड ः विनयभंगासह अनेक गुन्हे असणार्‍या रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे सध्या तुरूंगात असून, त्याचा जामीन अर्ज श्रीगोंदे न्या

बॉलीवूड अभिनेत्री अर्शिन मेहता सोबत दिलखुलास संवाद l Bollywood Actress Arshin Mehta l पहा LokNews24
रेमडीसीवीर-ऑक्सिजनचा पुन्हा तुटवडा…रुग्णांसह प्रशासनही चिंतेत..
श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा दहावीचा 94.22 टक्के निकाल

जामखेड ः विनयभंगासह अनेक गुन्हे असणार्‍या रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे सध्या तुरूंगात असून, त्याचा जामीन अर्ज श्रीगोंदे न्यायालयाने फेटाळला आहे. रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत होती. फीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात होते. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींचा देखील शारीरिक छळ येथे केला जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी डॉ. मोरेला इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून अटक केली होती.
स्त्रीलंपट असणार्‍या डॉ. मोरेंच्या विरोधात आणखीही 10 मुलींनी   तक्रार अर्ज दिलेले आहेत. त्यातील एका विद्यार्थिनीच्या जबाबावरुन कलम 509, 500 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यापूर्वीच्या अशाच प्रकारे नोंद झालेल्या कलम 354, 354अ, 509 या गुन्हामध्ये सदर आरोपीविरुध्द एकूण 23 मुलींनी तक्रारी अर्ज केले होते. मोरे विरुद्ध आतापर्यंत सहा वेगवेगळया दखलपात्र गुन्हयांची नोंद झालेली आहे. तसेच एकूण 4 अदखलपात्र गुन्हयांची नोंद झालेली आहे. तेव्हा आरोपीस जामीन मंजूर झाल्यास तो अशाच प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच न्यायालयाने आरोपीस या पुर्वीच्या गुन्ह्यात दिलेल्या जामीनाचे अटी व शर्तीचे वारंवार उल्लघंन करीत आहे. आरोपीला कायद्याचा धाक नसल्याचे दिसून येते . त्यामुळे आरोपी डॉ. भास्कर मोरेचा जामीन अर्ज श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी फेटाळल्याने  मोरेचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सदर प्रकरणी डॉ. भास्कर मोरेचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा यासाठी फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. कापसे, अ‍ॅड. अनिकेत भोसले, अ‍ॅड. अमोल जगताप, अ‍ॅड. सुमित बोरा अ‍ॅड. अभिषेक तोरडमल यांनी काम पाहिले.

COMMENTS