Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचित आणि शिवसेनेची युतीची आज घोषणा ?

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्यात युती होण्याच्या चर्चा सुरु असल्या तरी, अद्याप यावर निर्णय झालेला

प्रामाणिकपणा व इमानदारी हीच आदिवासी समाजाची कवच कुंडले ः पो.नि.देसले
पंतप्रधान मोदी आज कारगिलला भेट देणार
लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्यात युती होण्याच्या चर्चा सुरु असल्या तरी, अद्याप यावर निर्णय झालेला नाही. शिवसेना आणि वंचित बहुजन यांची युती झालेली नाही. मात्र युतीच्या मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अजूनपर्यंत अधिकृत जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र याची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उद्धव ठाकरे आणि अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर हे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा करु शकतात.

यासंदर्भात बोलतांना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेसोबतच्या युतीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज सोमवारी भाष्य करणार आहे. त्यामुळे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेशी आमचे नाते अजून जुळलेले नाही, आम्ही फक्त एकमेकांवर लाईन मारत असल्याचे वक्तव्य अ‍ॅड. आंबेडकरांनी काल नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात केले होते. यावरून सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात अखेर आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. बहुजन आघाडी कोकण सोडून इतर चार मतदार संघात निवडणूक लढणार आहे. अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्रावर शैक्षणिक धोरण लादत असल्याची टीका आंबेडकर यांनी केली. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, 11+4 अशाप्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र याचा कुठलाही आराखडा तयार नाही. याबाबत शिक्षकांची तयारी, ट्रेनिंग काहीही झाले नाही. प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्रशासन हे धोरण आपल्या राज्यावर लादत आहे. आमचा बदलाला विरोध नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप हे सर्व खासगीकरणाच्या समर्थनात आहेत.

COMMENTS