Homeताज्या बातम्यादेश

तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये चरबीचा वापर

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा खळबळजनक आरोप

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील वायएसआर काँग्रेसवरच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणार्‍या लाडू

आचारसंहिता आणि आयोग !
उजनी उपसा जलसिंचन योजनेबाबत तुमची साक्ष अदखलपात्र ः बाबुराव थोरात
तवांग सीमेवर भारत-चीन सैनिकांत चकमक

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील वायएसआर काँग्रेसवरच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणार्‍या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. लाडू तयार करतांना शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली, असा आरोप चंद्राबाबू यांनी केला आहे.
वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने हा आरोप दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हणत नाकारला आहे. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण तिरुमला तिरुपती देवस्थानाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व चंद्राबाबू नायडू यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीनं भक्तांना देण्यात येणार्‍या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप खुद्द मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्याने मोठा गदारोळ माजला आहे. नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.

COMMENTS