Homeताज्या बातम्यादेश

मास्क वापरा, परदेश प्रवास टाळा  

नववर्षांच्या स्वागतावर निर्बंध येण्याचे आरोग्यमंत्री मांडविया यांचे संकेत

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकार सावध झाले असून, त्वरित उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. भारतात बीएफ-7 या व्ह

श्री क्षेत्र महेश्‍वर व अमृतेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर
ओबीसी आरक्षणावर नवीन बिल आणणार ; अजित पवार | LOKNews24
Sangamner : संगमनेर शहरामध्ये ६० टक्के लसीकरण पूर्ण (Video)

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकार सावध झाले असून, त्वरित उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. भारतात बीएफ-7 या व्हेरियंटचे चार रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून, याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लोकसभेत बोलतांना केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, आम्ही जागतिक स्तरावर कोरोनाची काय स्थिती आहे यावर लक्ष ठेवून आहोत. त्यानुसारच आम्ही पावले उचलत आहोत. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नववर्षाच्या स्वागतावर निर्बंध येऊ शकतात असे संकेत दिले आहेत. राज्यांना मास्कसक्ती, तसेच परदेश प्रवास टाळणे, सॅनिटायजरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आल्याचेही ते म्हणाले आहेत.

कोरोनाच्या नव्या उपप्रकारांची माहिती मिळवण्यासाठी राज्यांना जनुक्रीय क्रमनिर्धारण करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती मनसुख मांडविया यांनी दिली. गेल्या 3 वर्षांत व्हायरसच्या बदलत्या स्वरूपामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम प्रत्येक देशावर झाला. एका वर्षात भारतात कोविड प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. सध्या दररोज 153 केसेस येत आहेत. जगभरात दररोज 5.87 लाख केसेसची नोंद होत आहे. जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स यांसारख्या देशांमध्ये कोविडमुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या वाढली आहे, असे मनसुख मांडविया यांनी म्हटले. ते म्हणाले की, नवीन प्रकारामुळे आव्हान वाढले आहे. प्रत्येक प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. कोविड महामारीचे व्यवस्थापन केले आहे. राज्यांना मदत केली, जेणेकरून ते कोविडविरुद्ध लढू शकतील. 220 कोटी कोविड लस देण्यात आल्या आहेत. 90 टक्के लोकसंख्येला दोन्ही लसी मिळाल्या आहेत. 25 कोटींहून अधिक लोकांना प्रिकॉशन डोस देण्यात आला आहे. ’भारत आधीच चाचणी, ट्रॅक आणि उपचारांसह लसीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे. ही महामारी थांबवण्याचा निर्धार आहे. आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. ही महामारी अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. सावधगिरीचा डोस लागू केल्यानंतर कोविड प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे. आपला शत्रू वेळोवेळी बदलत आहे. त्याच्याविरुद्ध सातत्याने लढा देण्याची गरज आहे. चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. भारतातही सरकार अलर्ट मोडवर आले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचा सतर्कतेचा इशारा – चीन, जपानमधील कोरोनाच्या हाहाकारामुळे केंद्र सरकारने सावध पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या रुग्णांमधली वाढ लक्षात घेता, इंडियन मेडिकल असोसिएशनने सतर्कतेचा इशारा दिला आहे. लोकांनी तत्काळ प्रभावाने कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन इंंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे. मेडिकल असोसिएशनचे म्हणणे आहे की, जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत जगात 5 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे पाहता कोरोना प्रोटोकॉल पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वसामान्यांना तसेच केंद्र सरकारला विशेष आवाहन केले आहे. यावेळी केंद्र सरकारला कोरोना येण्याआधीच सर्व तयारी करावी लागणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. देशातील परिस्थिती 2021 सारखी बिघडू नये यासाठी सरकारला सर्व मंत्रालये आणि विभागांना सोबत घेऊन तयारी करावी लागेल, असे संघटनेच्या प्रमुख डॉक्टरांनी सांगितले.

COMMENTS