Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हेळगावचे उपसरपंच पद तीन जणांना विभागून दिले जाणार: ग्रामपंचायतीची पहिली सभा संपन्न

मसूर / वार्ताहर : कराड उत्तर मतदार संघातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या हेळगाव ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत

राष्ट्रवादीविरुध्द बंड, सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या गोटात
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा जिल्ह्यात दाखल : जिल्हाधिकारी
1 जुलैपासून एकल वापर प्लास्टिकवर बंदी : शेखर सिंह

मसूर / वार्ताहर : कराड उत्तर मतदार संघातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या हेळगाव ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व माझी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांना मानणार्‍या सह्याद्री ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली होती. लोकनियुक्त सरपंच पदासह 10 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व सिध्द केले होते. आज त्याची पहिली सभा निवडणूक निर्णय अधिकारी के. के. मोडक व ग्रामविकास अधिकारी मनीष पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात झाली. त्यामध्ये शिवाजी रघुनाथ चोरमले यांची उपसरपंच पदासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. पार्टी मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे पहिली दोन वर्ष चोरमले यांना संधी देऊन पुढील तीन वर्षात दोन सदस्यांना उपसरपंच पदाची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच मिलिंद कृष्णा पाटील यांच्यासह सदस्य अजय विनायक सूर्यवंशी, समाधान हनुमंत बानुगडे, वैभव किशोर इंगळे तसेच ग्रामपंचायत सदस्या शोभा विजय शिंदे, सुवर्णा बबन सूर्यवंशी, सविता रामचंद्र नलवडे, अर्चना प्रभाकर गायकवाड व वैशाली प्रकाश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. यावेळी सरपंच व उपसरपंचांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सह्याद्री ग्रामविकास पॅनेलसाठी मार्गदर्शन करणारे माजी तालुका पंचायत सदस्य अशोक संकपाळ, शशिकांत जगदाळे तसेच यात्रा कमिटी अध्यक्ष हनुमंत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सदाशिव पवार, माजी अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, माजी सरपंच बाळकृष्ण जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ सूर्यवंशी, विकास सोसायटी सदस्य संदीप सूर्यवंशी, माजी चेअरमन प्रल्हाद सूर्यवंशी, अशोक चव्हाण, रामचंद्र पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्रीमंत सूर्यवंशी, ज्येष्ठ नागरिक कॅप्टन नारायण सूर्यवंशी, किसन निंबाळकर, सुरेश पाटील, प्रताप सूर्यवंशी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या सर्व कामकाजात प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी संगणक परिचारिका सीमा मंद्रुळकर, क्लार्क कोमल कणसे, शिपाई अनिल कणसे, संभाजी भंडारे यांनी नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास साधणार : सरपंच मिलिंद पाटील
लोकशाहीमध्ये कामकाज करत असताना सर्वांना समान संधी दिली जाते. राजकारणात हार जीत हा भाग असतोच परंतू गावची एकदा का निवडणूक झाली की तिथून पुढे सर्वांना एकत्रच घेऊन गाव आणि ग्रामस्थ हे आपले एकच कुटुंब आहे, असे समजून कामकाज केल्यास गावचा सर्वांगीण विकास साधता येतो.

COMMENTS