Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मानधन, सन्मान आणि न्याय मिळेपर्यंत नोटा हाच पर्याय

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी फेस्वकॉमचा निवडणूकपूर्व इशारानांदेड । प्रतिनिधीयेत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्

उपवासात भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन
भाजपाच्या विकसित नांदेडसाठी घोषित केलेल्या निवडणूक संकल्पनाम्याप्रमाणे शहराच्या विकासासाठी हजार कोटींची गरज
हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त नांदेड शहरातील आठवडी बाजार 25 जानेवारी रोजी बंद

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी फेस्वकॉमचा निवडणूकपूर्व इशारा
नांदेड । प्रतिनिधी
येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष वेधत फेस्कॉम (ज्येष्ठ नागरिक संघ) उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी ठाम आणि आक्रमक निवेदन प्रसिद्ध केले आहे. हे निवेदन केवळ निवडणूक काळापुरते मर्यादित नसून, गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचा आक्रोश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी मतदान करणारच, असे सांगत डॉ. वैद्य यांनी लोकशाहीवरचा विश्वास व्यक्त केला. मात्र, सत्ताधारी व विरोधी सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, निवडणुकीत विजय हवा असेल तर मतदानापूर्वी ज्येष्ठ नागरिकांचे मानधन, प्रलंबित मागण्या व सन्मानाचे प्रश्न तातडीने सोडवावे लागतील. ज्येष्ठ नागरिक हे समाजावर ओझे नसून राष्ट्राची संपत्ती असल्याचे नमूद करत, आयुष्यभर समाज व देशासाठी योगदान दिल्यानंतरही त्यांना सन्मान, सुरक्षितता व आर्थिक आधारासाठी संघर्ष करावा लागत असल्यास, ते लोकशाही व्यवस्थेचे अपयश असल्याचे डॉ. वैद्य यांनी ठामपणे सांगितले. मागण्या प्रलंबित ठेवल्या गेल्यास त्याची किंमत राजकीय पक्षांना निवडणुकीत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. नोटांच्या जोरावर व दिखाऊ आश्वासनांद्वारे मते मिळवण्याच्या राजकारणावर टीका करत, शेतकरी, कामगार, विधवा, निराधार, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न जर या निवडणुकीत सुटले नाहीत, तर मतदारांचा रोष सहन करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. गत महामेळाव्यात झालेल्या ठरावाचा पुनरुच्चार करत, नोटा  हा ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभावी लोकशाही अस्त्र ठरू शकतो, असे मत त्यांनी मांडले. कोणताही पक्ष ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसेल, तर निषेध म्हणून छजढ- चा वापर करावा, तसेच कुटुंबीयांनीही त्यास पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मानधन, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व सन्मान या मूलभूत मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार डॉ. वैद्य यांनी व्यक्त केला. फेस्कॉम, नांदेड व उत्तर मराठवाडा विभागातील हजारो ज्येष्ठ नागरिकांच्या भावना या निवेदनातून व्यक्त होत असून, येत्या निवडणुकीत हा आवाज किती निर्णायक ठरतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS