Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट

पुढील चार दिवस पावसाचा इशारा

पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह, पुणे, ठाणे, कल्याण, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह अहमदनगर जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाच्या सरी

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी
राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस
राज्यात उद्यापासून अवकाळी पावसाचे संकट !

पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह, पुणे, ठाणे, कल्याण, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह अहमदनगर जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाच्या सरी कोसळल्याचे दिसून आले. राज्यावर पुढील काही दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचे हे संकट आणखी चार दिवस कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पुढील चार दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर येत्या 24 तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात पडणार्‍या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहेत, तर दुसरीकडे या पावसामुळे प्रदूषण कमी होण्याचा फायदा होतांना दिसून येत आहे.  राज्यात प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. सर्वाधिक फटका हा मुंबई आणि पुण्याला बसला आहे. यामुळे नागरीक त्रस्त असतांना त्यांना गुरुवारी मुंबईसह उपनगरांत आणि पुण्यातील काही भागांत झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे दोन्ही शहरातील हवा गुणवत्ता पातळीत समाधानकारक श्रेणीत आली आहेत. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा 94 तर पुण्यात 82 वर आला आहे. मुंबई आणि पुण्यातील प्रदूषणाने उच्चांक गाठला होता. देशात दिल्ली पाठोपाठ मुंबई आणि पुणे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ओळखल्या जाऊ लागले होते. यामुळे केंद्र आणि राज्य सरकार अ‍ॅक्टिव मोड वर आले होते. प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाय योजणार आखण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत अनेक उपाय योजना लागू करण्यात आल्या. अनेक बांधकाम प्रकल्प बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यावर पाणी मारण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या होत्या. दरम्यान, अवकाळी पावसामुळे हवा गुणवत्ता पातळीत सुधारणा झाली आहे. प्रदूषणाचा स्तर थोडा कमी झाला आहे. मुंबई आणि उपनगरातील हवा गुणवत्ता पातळी कमी झालेली आढळली, भांडूपमध्ये हवा गुणवत्ता पातळी ही 85 एक्यूआय होती. तर कुलाबा परीसारतात 66 एक्यूआय पातळी नोंदवण्यात आली. मालाड येथे 73, माझगाव येथे 103, वरळी येथे 53, बोरवली येथे 99, बीकेसी येथे 127, चेंबूर येथे 73, अंधेरी येथे 75, नवी मुंबई येथे 102 एक्यूआय पातळी नोंदवण्यात आली. तर पुण्यात आणि उपनगरात पाषाण येथे सर्वाधिक कमी 43 एक्यूआय पातळी नोंदवण्यात आली. तर शिवाजीनगर येथे 127 एक्यूआय पातळी नोंदवण्यात आली. लोहगाव येथे 83, आळंदी येथे 57, कात्रज 46, हडपसर येथे 113, भोसरी येथे 79, निगडी येथे 89, भुमकर चौक येथे 89, कौथरुड येथे देखील 95 एक्यूआय हवेच्या पातळीची नोंद करण्यात आली.

पावसामुळे प्रदूषणापासून दिलासा – राज्यात मुंबईसह पुण्यात वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावली होती. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. नागरिकांना श्‍वसनाचे आजार होवू लागले होते, मात्र अवकाळी झालेल्या पावसामुळे प्रदूषण पातळी घसरण्यास मदत झाली असून, हवेची पातळी सुधारण्यास मदत होतांना दिसून येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे राज्य सरकारने काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विशेष नियमावली देखील जाहीर केली आहे. दरम्यान, मुंबई आणि पुण्यात झालेल्या पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली असून प्रदूषण कमी झाल्याचे पहायला मिळाले.

COMMENTS