Homeताज्या बातम्यासंपादकीय

  असंघटित उद्योग क्षेत्र अर्थव्यवस्थेत प्रभावी !

 कॉर्पोरेट क्षेत्राचे कार्य किंवा आर्थिक उलाढाल कशी चालली हे आपणांस, हे शेअर बाजाराच्या सूचकांक वरून कळत असते. त्यातून उद्योग जगाचा एकूणच आढावा आ

इंधन दरवाढ कपातीचे गौडबंगाल !
विषमतेत वाढ दर्शविणारा अहवाल, चिंताजनक!
आरोग्य धोरण आवश्यक!

 कॉर्पोरेट क्षेत्राचे कार्य किंवा आर्थिक उलाढाल कशी चालली हे आपणांस, हे शेअर बाजाराच्या सूचकांक वरून कळत असते. त्यातून उद्योग जगाचा एकूणच आढावा आपल्याला कळतो. परंतु,  देशात कार्यरत असलेल्या असंघटित क्षेत्रातील करोडो व्यवसायांपैकी केवळ काहीच क्षेत्रात कॉर्पोरेट्स उद्योग कार्य करतात. अर्थात, सध्या आणि केव्हाही शेअर बाजाराचा सूचकांक जनहीताच्या किंवा जनकल्याणाच्या अर्थविषयक धोरणांसाठी कितपत उपयोगी ठरतो, हे काही सांगता येत नाही. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ चा जीडीपी या शेअर बाजारातूनही लक्षात येत असला तरी, एकूणच अर्थव्यवस्थेच्या धोरणाची त्या अनुषंगाने सांगड घालता येत नाही. शेअर बाजाराची सध्याची आकडेवारी सन २०२१ मध्ये गाठलेल्या त्यांच्या ऐतिहासिक उच्चांकाच्या अगदी जवळ आहेत, असे, नुकतेच, एका अहवालानुसार प्रसिद्ध झाले असले तरी, त्यावरून फक्त संघटीत उद्योग क्षेत्राचीच आकडेवारी कळते. शेअर बाजार आणि अर्थव्यवस्था यांच्यातील हे संबंध जी वाढ दाखवते ती प्रामुख्याने अर्थव्यवस्थेतील कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योगांच्या नफ्यातील वाढ दर्शवते – परंतु, त्यासाठी आपणांस या बाजाराचा आणि देशातील एकूण व्यापाराचा संबंधही तपासायला हवा. या वर्षाच्या मध्ये जाहीर झालेल्या जवळपास पावणेतीन हजार गैर-सरकारी, गैर-वित्तीय कंपन्यांवरील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेटावरून असे दिसून येते की, या कंपन्यांच्या व्यवसायात म्हणजे विक्री अथवा सेवेत एक्केचाळीस टक्क्यांनी वाढ झाली; आणि निव्वळ नफ्यात म्हणजे विक्रीनंतर सर्व खर्च वजा जाता निव्वळ नफा हा पंचवीस टक्के एवढा भरघोस झाल्याचे दाखवते. ही वाढ झाली असली तरी ही आकडेवारी नोंदणीकृत व्यवसायांचीच आहे. असंघटित उद्योग क्षेत्रातील अनेक उद्योग किंवा व्यापार असे आहेत, की, ज्यांची थेट माहिती मिळू शकण्याची शक्यता बरीच कमी असते..या कालावधीत 10% च्या वर वाढलेल्या घाऊक किंमत निर्देशांकाने (WPI) ही आकडेवारी कमी केली असली तरी, कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढ अर्थव्यवस्थेच्या वाढीपेक्षा जास्त आहे. जर अर्थव्यवस्थेचा एक घटक इतक्या वेगाने वाढत असेल तर दुसरा भाग, उद्योगातील बिगर-कॉर्पोरेट क्षेत्र, संकुचित होत असेल. अधिकृत डेटाची अडचण अशी आहे की ते असंघटित क्षेत्राची घसरण स्वतंत्रपणे पकडत नाही. जर वाढीचा खरा दर मिळू शकला तर अधिकृत विकास दर आणि शेअर बाजारातील वाढ यांच्यातील विसंगती आणखी जास्त असेल. ताज्या आकडेवारीनुसार कर महसुलात साडेबावन्न टक्के वाढ झाली आहे. परंतु हे असंघटित क्षेत्राचा निर्देश करत नाही! जिथे बहुतेक उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे आणि ज्याला वस्तू आणि सेवा करातून सूट आहे. यात आश्चर्य नाही की, या वर्षाच्या सुरुवातीला किमंत सूचकांक द्वारे जारी केलेल्या उत्पन्नाचे सर्वेक्षण उत्पन्नाच्या शिडीत वरच्या वर्गातील आणि खालच्या वर्गातील वाढते विभाजन मोठ्याप्रमाणात दर्शवते. या सूचकांकानुसार उत्पन्नात वाढ झालेले उद्योग वीस टक्के उद्योग एकूणच सर्वाधिक उत्पन्न गोळा करताहेत; तर, उर्वरित ऐंशी टक्के उद्योग जगत जे संघटीत काॅर्पोरेट क्षेत्राचा भाग आहे, त्यांच्या उत्पन्नात घट तरी झाली आहे किंवा ते उद्योग मागे तरी पडलें आहेत, असे लक्षात येते. थोडक्यात, सांगावयाचे झाल्यास, असंघटित क्षेत्रातील उद्योग देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका निभावत असताना, त्यांना त्याचे श्रेय दिले जात नाही; अन् ना त्यांना एकूण अर्थव्यवस्थेत कोणते स्थान दिले जात आहे. त्यामुळे, या क्षेत्रातील उद्योगांची आता स्वतंत्र दखल घेऊन त्यांचे महत्त्व वाढवायला हवे.

COMMENTS