Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईकडून झालेल्या मारहाणीत साडेतीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

सावत्र आईची अमानुष मारहाण

कल्याण प्रतिनिधी- सावत्र आईने अमानुषपणे केलेल्या मारहाणीत  कार्तिक जैस्वाल(Karthik Jaiswal) या साडेतीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची

राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या तरुणाला चोप | LOKNews24
सामाजिकतेचे राजकिय भान!
 वाळू माफियांच्या दहशतीने हादरला जालना जिल्हा 

कल्याण प्रतिनिधी– सावत्र आईने अमानुषपणे केलेल्या मारहाणीत  कार्तिक जैस्वाल(Karthik Jaiswal) या साडेतीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून सावत्र आईला टिळकनगर पोलिसांनी (Tilaknagar Police)अटक केली आहे. अंतिमादेवी संजय जैस्वाल (वय२८) असे तिचे नाव आहे. ही घटना पुर्वेकडील पाथर्ली, गायकवाड वाडी येथील सिताबाई निवास येथे घडली. अंतिमादेवी ही नेहमी सावत्र मुलांना मारहाण करायची. दरम्यान तिने साडेतीन वर्षाच्या कार्तिकला लाथा बुक्यांनी आणि वायरने बेदम अमानुषपणे मारहाण केली. या जबर मारहाणीत कार्तिक बेशुद्ध पडला. त्याला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले गेले. परंतू कार्तिक ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले . मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकणी त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अंतिमादेवी हिला अटक करण्यात आली आहे.

COMMENTS