Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हिजन रंगोत्सव अंतर्गत शहरातील बच्चे कंपनीकडून लुटला रंगाचा मनमुराद आनंद

न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या वतीने आयोजित व्हिजन रंगोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई शहरातील विद्यार्थ्यांसाठी श्री. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या टॉडर्लर्स व्हिलेच्या

इंद्रायणीत जाणारे दूषित पाणी तत्काळ रोखा
एलॉन मस्क देणार ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा
आरोपीचा पोलिस कोठडीत आत्मसन्मान भंग होऊ देऊ नका

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई शहरातील विद्यार्थ्यांसाठी श्री. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या टॉडर्लर्स व्हिलेच्या वतीने अंबाजोगाई शहर व अंबाजोगाई परिसरातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी व्हिजन रंगोत्सव अर्थात रंगभरण स्पर्धेचे आयोजन दि. 30 मार्च रोजी मोदी लर्निंग सेंटर, रिंग रोड, अंबाजोगाई या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत अंबाजोगाई शहरातील विविध शाळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपला सहभाग मोठ्या संख्येने नोंदविला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य  प्रवीण शेळके व पालक प्रतिनिधी गोरमाळी हनुमंत,  नितीन गायकवाड , सिद्धेश्वर उरगुंडे ,शितल मुंदडा, स्मिता चौधरी यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
या  कार्यक्रमात कार्टून मॅन सर्व बाल गोपाळांचे लक्ष वेधून घेत होता. या कार्टून मॅन ने छोटा भीमच्या वेशभूषेत येऊन बालचिमुकल्या सोबत विविध बालगीतांवर नृत्य करून त्यांचे मनोरंजन करून बालचिमुकल्यांची मने जिंकून घेतली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या विविध विषयांवरील चित्रात नाना तर्‍हेची रंगभरण केले .  या रंगभरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत होते. स्पर्धेसाठी  एक हजार विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी , संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, संस्थेचे सल्लागार वसंत चव्हाण, धनराज सोळंकी, शाळेचे प्राचार्य  प्रवीण शेळके तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका परमाप्रिया गायकवाड, शारदा शिंदे, शिल्पा पौळ, पर्यवेक्षक प्रदीप खटाळ, तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.

COMMENTS