Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूरात उजनीचा कालवा फुटला

शेकडो एकर शेती गेली पाण्याखाली

सोलापूर/प्रतिनिधी ः सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. रविवारी पहाटेच ही घटना घडली. पाटकुल गावात

सुप्रिया सुळेंकडून सिंदखेड राजात आढावा… विकासकामांसाठी भेटणार केंद्रीय पर्यटनमंत्र्यांना
संचालक पदासाठी न्यायालयात जाणार – अण्णासाहेब शेलार
आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही : अण्णा हजारे

सोलापूर/प्रतिनिधी ः सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. रविवारी पहाटेच ही घटना घडली. पाटकुल गावातील उजनीचा कालवा फुटल्याने शेकडो एकरमधील शेती पाण्याखाली गेली आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकर्‍यांची पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. शेतकर्‍यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. जवळपास 112 किलोमीटर लांब असलेला हा कालवा रविवारी पहाटे अजानक पाटकुल गावात फुटला. त्यामुळे पाण्याचा मोठा ओढा शेतकर्‍यांच्या शेतात वाहू लागला. पाटकुल गावातील शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसला आहे. या शेतकर्‍यांची डाळिंब, ऊसासह जवळपास सर्वच पिके पाण्याखाली गेली आहेत. गावातील जवळपास सर्व द्राक्ष बागा पाण्याखाली गेल्या आहेत. गावातील शेतांमध्ये आता केवळ पाणी साचले आहे. कालवा फुटला कसा काय? हे अजून समजू शकले नाही. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

COMMENTS