Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले – आमदार राजळे

पाथर्डी/प्रतिनिधी ः स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केल्याने मह

खा.विखे यांच्या माध्यमातून शहराचा अनुशेष भरून काढू -: माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड
थोरात कारखान्यास ऊस विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नुपूर शर्मा विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करून अटक करा

पाथर्डी/प्रतिनिधी ः स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केल्याने महिलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम झाला. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श घालून देत आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी लोककल्याणकारी गोष्टीसाठी वेचले. आज त्यांच्यामुळेच महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूकीचा प्रारंभ कसबा पेठ येथील संत सावता महाराज मंदिरापासून करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. या जयंतीचे आयोजन सावित्रीबाई फुले उत्सव समिती कडून करण्यात आले होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,बजरंग घोडके,मंगल कोकाटे,श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे, मोहन महाराज सुडके,सुरेश कुचेरिया,रवींद्र आरोळे,धरमचंद गुगळे,राजेंद्र मुथा, डॉ.अभय भंडारी, डॉ. सचिन गांधी, धनंजय चितळे,राजेंद्र दुधाळ,राहुल तरवडे, राजेंद्र सोनटक्के,गणेश सोनटक्के, दिपक गादे,देविदास शिंदे,शंकर शिंदे आदी जण उपस्थित होते. भव्य दिव्य अशा मिरवणुकीमध्ये बँड पथक, तुतारी पथक, पिपाणी पथक,श्री तिलोक जैन विद्यालयातील सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थिनींनी तसेच सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणामुळे पोलीस अधिकारी, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू,डॉक्टर,इंजिनीयर,वकील असा वेश परिधान करत विद्यार्थिनी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीचा समारोप शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयांमध्ये करण्यात आला

COMMENTS