Homeताज्या बातम्यादेश

तब्बल 21 लाख दिव्यांनी उजळून निघणार उज्जैन

भोपाळ/वृत्तसंस्था ः मध्य प्रदेशात ‘शिवज्योती अर्पणम 2023’ या नावाने यंदाच्या म्हणजेच 18 फेब्रुवारीची महाशिवरात्र 21 लाख मातीच्या दिव्यांनी उजळून

श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने श्रीरामछंद प्रदर्शन
गुजरातेत विक्रम तर हिमाचलमध्ये पराभव ! 
आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा : पुरुषोत्तम बोर्डे 

भोपाळ/वृत्तसंस्था ः मध्य प्रदेशात ‘शिवज्योती अर्पणम 2023’ या नावाने यंदाच्या म्हणजेच 18 फेब्रुवारीची महाशिवरात्र 21 लाख मातीच्या दिव्यांनी उजळून जाणार आहे. यंदाची शिवरात्र उज्जैनवासीयांसाठी दिवाळीपेक्षा कमी नसेल. कारण, यंदा उज्जैनचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये पाहाण्याचे स्वप्न मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पाहिले आहे. त्याची पूर्वतयारीही उज्जैन शहरात पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार ‘शिवज्योती अर्पणम 2023’ या नावाने यंदाच्या म्हणजेच 18 फेब्रुवारीची महाशिवरात्र 21 लाख मातीच्या दिव्यांनी उजळून जाणार आहे. गेल्या वर्षी उज्जैनमध्ये महाशिवरात्रीला 11 लाख 71 हजार 78 मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. मुख्यमंत्री चौहान म्हणाले, ’महाशिवरात्रीला उज्जैनचे रहिवासी 21 लाख दिवे लावून भगवान महाकालाची भक्ती करतील. ही अभूतपूर्व घटना समाज आणि सरकारच्या सहभागानेच शक्य होईल.’ या बैठकीत अधिकार्यांनी सांगितले की, शिव ज्योती अर्पण कार्यक्रमांतर्गत उज्जैनमधील मंदिरे, व्यावसायिक ठिकाणे, घरे, क्षिप्रा नदीच्या काठी आणि महत्त्वाच्या शहरातील चौकाचौकात आणि इतर महत्वाच्या ठिकाणी दिवे लावले जातील. यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले की, महाशिवरात्रीला उज्जैनमध्ये होणारा हा संपूर्ण सोहळा शून्य कचरा (झिरो वेस्ट) तत्त्वावर आधारित असेल. या कार्यक्रमात 20 हजाराहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळेस उज्जैनच्या प्रमुख स्थळांवर भव्य रांगोळीही काढली जाईल आणि उज्जैन नगरी रांगोळ्या आणि दिव्यांच्या झगमगाटाने एखाद्या नववधूसारखी सजवली जाणार आहे. हा सोहळा जगभरातल्या लोकांसाठी एक आनंद सोहळा असेल असे मत इथल्या अधिकार्‍यांनी व्यक्त केले.

COMMENTS