Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दुसर्‍या दिवशी तपासणी!

लातूर : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. औसा येथील हेलीपॅडवर ही तपा

भूसंपादन रखडण्यामुळे महापालिकेला 294 कोटींचा फटका
गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नांदेड घटनेत चौकशीअंती दोषींवर कारवाई

लातूर : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. औसा येथील हेलीपॅडवर ही तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरदेखील होते. राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला रंग भरला असतानाच निवडणूक यंत्रणाही अलर्ट झाली आहे. पोलीस यंत्रणेसह निवडणूक आयोगाचे कर्मचारीही गस्त घालत आहेत. अशातत शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यांची सलग दुसर्‍या दिवशी बॅग तपासण्यात आली आहे. सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात प्रचारासाठी गेल्यानंतर हेलिपॅडवरच ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आज औसा येथे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी करण्यात आली आहे. या घटनेवर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत कर्मचार्‍यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. तसेच, त्यांचे आयडी आणि अपॉईंटमेंट लेटरही दाखवण्यास सांगितलं. या घटनेचा व्हिडिओ स्वत: उद्धव ठाकरेंनी शुट केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

COMMENTS