उपमुख्यमंत्री जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेल मध्ये असतील – आ. रवी राणा 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेल मध्ये असतील – आ. रवी राणा 

  नागपूर प्रतिनिधी- संजय राऊत बॉम्ब नाही तर लवंगी फटाके फोडत आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. उध्दव ठाकरे यांच्या अनेक फाईल पेंडींग आहेत का

महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे राजकीय स्टंट – रवी राणा 
मते द्या, अन्यथा पैसे खात्यातून काढून घेणार
अमरावती शहरात काल १७ तासात दोन जणांच्या हत्या.

  नागपूर प्रतिनिधी- संजय राऊत बॉम्ब नाही तर लवंगी फटाके फोडत आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. उध्दव ठाकरे यांच्या अनेक फाईल पेंडींग आहेत काहींचा तपास सुरू आहे. आधीच त्यांचे 40 आमदार सोडून गेले हा बॉम्ब आधीच फुटला आहे.  फडणवीस जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उध्दव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेल मध्ये असतील. असा बॉम्ब फुटला तर संजय राऊत यांना कुठे पळायचं हे सुचणार नाही,त्यांनी नागपुरात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये गेल्या अडीच वर्ष उध्दव ठाकरे यांनी कुठले पाच काम केले हे संजय राऊत यांनी सांगितलं तर मी त्यांना बक्षीस देईल. संजय राऊत म्हणतील तर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बक्षीस देईल, कुठलेही काम न करता फडणवीस यांनी केलेल्या कामाचे उद्घाटन केले. अनेक बॉम्ब देवेंद्र फडणवीस यांनी फोडले आहे आता फडणवीस बॉम्ब फोडतिल तर हे कुठेही दिसणार नाही. महा विकास आघडतील अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात जामिनावर बाहेर आहे त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेला लोकांना अशी भाषा शोभत नाही. 

COMMENTS