Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साताऱ्यात उदयनराजे भोसले आघाडीवर

सातारा - राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघातील मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजप

एफ़ ए डी ए ची व्यावसायिक बैठक नाशिक येथे संपन्न 
परीक्षेहून परतणाऱ्या ३ विद्यार्थीनींवर काळाचा घाला 
अमरावतीत बंदला हिंसक वळण ; संचारबंदी लागू

सातारा – राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघातील मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे गेला. भाजपनं राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे  होता. महाविकास आघाडीतून विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात होते. दोन्ही बाजूनं सातारा लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार प्रचार करण्यात आला.सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. साताऱ्यात 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सातारा लोकसभा मतदारसंघात अखेर उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. शशिकांत शिंदे 13 व्या फेरीनंतर पिछाडीवर गेले आहेत.   

COMMENTS