पुणे प्रतिनिधी- पुण्यात काल आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची सभा होती. त्याच दरम्यान माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत(Uday Samantha)
पुणे प्रतिनिधी- पुण्यात काल आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची सभा होती. त्याच दरम्यान माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत(Uday Samantha) हे आले असताना त्यांच्या गाडीवर हल्ल्याची घटना घडली. रात्री हल्ला झाल्यानंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलाताना सांगितले की, “माझ्यापुढे आदित्य ठाकरे यांचा ताफा नव्हता. मी खोटं सांगणार नाही. आम्ही तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांच्या घरी जात होतो. त्यानंतर सिग्नल लागले. सिग्नल लागल्यामुळे नियमाप्रमाणे थांबलो असता तेव्हा माझ्या बाजूला दोन गाड्या आल्या असून ५० ते ६० शिवसैनिक होते. मात्र शिवसैनिकांनी काहीही केलेले नाही. फक्त १२ ते १५ लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला”असे ते म्हणाले.
COMMENTS