Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेततळयात पडून दोन लहानग्या भावांचा मृत्यू

अहमदनगर प्रतिनिधी ः जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमीचा आनंद साजरा केला जात असतांनाच श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यकनाथ येथील खामकरवाडी येथे शेततळ्यात प

प्रियंका शिंदे यांना महिला लिडर बिझनेस पुरस्कार
रेल्वे हमाल-माथाडींच्या मेळाव्यात एकजुटीतून संघर्षाचा नारा
संगमनेर तालुक्यात नवदाम्पत्याची आत्महत्या

अहमदनगर प्रतिनिधी ः जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमीचा आनंद साजरा केला जात असतांनाच श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यकनाथ येथील खामकरवाडी येथे शेततळ्यात पडून दोन लहानग्या सख्या भावांचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. आर्यन (8) व अनिकेत बंडोपंत साळुंके (9, रा. खामकरवाडी ता. श्रीगोंदा) अशी मृत्यु पावलेल्या भावांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन सख्ये भाऊ रंगपंचमी खेळत असताना पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर घराजवळील शेततळ्यात पडुन मृत्यु पावले. या घडनेनंतर खामकरवाडी परीसरासह लोणी व्यकनाथ गावावर शोककळा पसरली. या चिमकुल्यांच्या आई वडिलांसह जवळच्या नातलगांनी केलेल्या आक्रोशाने सर्वजन हेलावले. बंडोपंत साळुंके हे अल्पभुधारक शेतकरी असल्याने ते आपल्या कुटुबांच्या उपजिवीकेसाठी घरची शेती कसता कसता शेतमजुर म्हणुन कामक करत होते. काही दिवसापुर्वी त्यांच्या चुलत भावाने घरानजवळ छोटे शेततळे केले होते. शेतीसह शेळ्यांना पाणी उपलब्ध होईल असा मानस होता. परंतु  रविवार त्यांत रंगपंचमी असल्याने लहान मुले खेळत खेळत गेली व त्या शेततळ्याला जाळीचे कुंपण नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS