पुणे : पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादात मित्राचा खून करुन पसार झालेल्या दोन कामगारांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघा आरोपींना
पुणे : पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादात मित्राचा खून करुन पसार झालेल्या दोन कामगारांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघा आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वाघोली येथील केसनंद रस्त्यावर सिट्रॉन सोसायटीसमोर ही घटना घडली होती. शैलेंद्र अप्पा मंडगीकर (वय 22, रा. लेबर कॅम्प, केसनंद रस्ता, वाघोली) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. राम सुभाष श्रीरामे (वय 22, रा. बेरळी बुद्रूक, ता. देगलूर, जि. नांदेड) आणि गोपाल ज्ञानोबा कोतलापुरे (वय 26, रा. नांदेड नाका, लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
COMMENTS