Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरधाव एसटीचे दोन चाके निखळले

35 प्रवासी थोडक्यात बचावले

पुणे/प्रतिनिधी ः बसचा प्रवास सुरक्षित समजला जातो, त्यामुळे ग्रामीण भागात शक्यतो एसटी बसच्या प्रवासालाच प्राधान्य दिले जाते. मात्र आता एसटी बसचे अ

शेततळ्यात बुडून बापलेकासह भाच्याचा मृत्यू l पहा LokNews24
वाहनचोरी करणार्‍या चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला कौल

पुणे/प्रतिनिधी ः बसचा प्रवास सुरक्षित समजला जातो, त्यामुळे ग्रामीण भागात शक्यतो एसटी बसच्या प्रवासालाच प्राधान्य दिले जाते. मात्र आता एसटी बसचे अपघात आणि नादुरुस्त बसचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव एसटीचे दोन चाके निखळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महामार्गावर एसटी धावत असतानाच तिचे एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत. या बसमध्ये 35 प्रवासी होते. पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडीत ही घटना घडली. या घटनेचे फोटो समोर आले आहेत. महामार्गावर बस धावत असतानाच बसची मागची दोन्ही चाके निखळली होती. त्यानंतर काही वेळ बस तीन चाकांवर धावत होती. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस अलगद रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. बसचे चाके निखळल्यानंतर बस रस्त्यावरच तिरपी धावत होती. या दरम्यान बसचा खालचा भाग रस्त्यावर घासला गेला. त्यामुळे मोठ्या ठिणग्या उडाल्या. अचानक ही घटना घडल्याने बसमधील प्रवासीही घाबरले. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले.

COMMENTS