Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 दुचाकी वाहन चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयीत पोलिसांच्या जाळ्यात 

अहमदनगर :  माळीवाडा बसस्थानक परिसरात दूचाकी वाहन चोरण्याच्या किंवा प्रवाशांच्या बॅगा चापसून चोरी करण्याच्या उद्देशाने संशयित्रीच्या अंधारात वावरण

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी कार्यवाही करा
श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार हा जीवनातील सर्वोच्च आनंद
दिपावली सणातून प्रत्येकाच्या जिवनात चैतन्य व आनंद निर्माण व्हावा – ना थोरात

अहमदनगर :  माळीवाडा बसस्थानक परिसरात दूचाकी वाहन चोरण्याच्या किंवा प्रवाशांच्या बॅगा चापसून चोरी करण्याच्या उद्देशाने संशयित्रीच्या अंधारात वावरणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून मोटारसायकलच्या सहा चाव्या जप्त केल्या ही कारवाई माळीवाडा बस स्थानक जवळ केली. या बाबतची माहिती अशी की कोतवाली पोलीस नगर शहर हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असता रात्री एक वाजण्याच्या दरम्यान माळीवाडा बस स्थानक परिसरात सेक्टर नं. 2 पेट्रोलिंगचे पोलिस कॉन्स्टेबल अमोल गाडे, पोलिस कॉन्स्टेबल अभय कदम यांना माळीवाडा बस स्थानक परिसरात माळीवाडा बसस्थानकाचे पाठीमागील बाजुस एक इसम अंधाराचा फायदा घेवुन त्याचे अस्तीत्व लपवुन थांबलेले दिसुन आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिस त्या संशयीत इसमांजवळ गेले असता तो तेथुन पळुन जावु लागला. त्यास पोलिस कॉन्स्टेबल अमोल गाडे जागीच पकडले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी सुरुवातीला त्यांचे नाव पत्ता सांगणेस टाळाटाळ केली, त्यांना पुन्हा विचारणा करुन त्याची कसून चौकशी करता त्यांनी त्यांची नाव प्रशांत रावसाहेब वडांगळे, (वय 27 वर्षे, रा.चिपाडे मळा, केडगाव,अ.नगर ) असे असल्याचे सांगीतले.त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात 100  रुपये किमतीच्या दुचाकी मोटार सायकलच्या 6 चाव्यांचा जुडगा त्याचे पँटचे खिशात मिळुन आला. त्या इसमास त्या ठिकाणी काय करत होतास ? बाबत विचारता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच जवळील चाव्यांच्या जुडग्याबाबत काहीएक माहीती दिली नाही. त्यावरुन  हा इसम सुर्यास्त ते सुर्यादय दरम्यान माळीवाडा बस स्थानक, अहमदनगर परिसरात दुचाकी चोरीसारखा अगर प्रवासी यांचे बॅगा चापसुन मालाविरुध्दचा गुन्हा करण्याचे उददेशाने स्वतःचे अस्तित्व लपवुन थांबलेला मिळुन आला आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस नाईक संदीप साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रशांत वडागळे याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास अंमलदार पोलिस हवालदार राजेंद्र औटी करीत आहे.

COMMENTS