Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओम्नी गाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघे जखमी

म्हसवड / वार्ताहर : कराड येथे आयुर्वेदिक औषध आणण्यासाठी निघालेल्या म्हसवड येथील तीन तरुणांच्या दुचाकीला राजाचे कुर्ले गावानजीक असलेल्या वळणावर कर

राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात आज प्रवेश
विरोधकांच्या भूलथापांना आता जनता फसणार नाही : निशिकांत भोसले-पाटील
कराडला रिक्षा व्यावसायिकांचे आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन

म्हसवड / वार्ताहर : कराड येथे आयुर्वेदिक औषध आणण्यासाठी निघालेल्या म्हसवड येथील तीन तरुणांच्या दुचाकीला राजाचे कुर्ले गावानजीक असलेल्या वळणावर कराडवरून भरधाव वेगाने आलेल्या मारूती ओमनी व्हॅनने समोरून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक जीवन प्रकाश धुमाळ (वय 43) याचा जागेवर मृत्यू झाला. तसेच पाठीमागे बसलेले विवेक तुकाराम कांबळे व विकास दत्तात्रय कांबळे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत. अपघातानंतर व्हॅन चालक घटनास्थळी न थांबता तेथून निघून गेला. अपघाताची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, म्हसवड येथील रहिवासी असलेला विकास कांबळे मुंबई येथे वास्तव्यास आहे. तो गावी आपल्या आजारी चुलतीला भेटण्यासाठी आला होता. तो बुधवारी सायंकाळी मुंबईला जाणार होता. कराड येथे आयुर्वेदिक औषध आणण्यासाठी विकास कांबळे आपला चुलत बंधू विवेक कांबळे यास बरोबर घेऊन सकाळी साडेदहाच्या दरम्यान निघाला होता. म्हसवड बसस्थानक चौकात एका दुकानात काम करत असलेल्या जीवन धुमाळ याच्याकडे विकास व विवेक गेले व कराडला चल म्हणून गळ घातली. त्यानंतर जीवनही या दोघांबरोबर कराडला निघाला. दुपारी दीडच्या दरम्यान राजाचे कुर्ले इ. येथील वळणावर कराडवरून आलेली ओमनी व्हॅन व म्हसवडवरून कराडकडे निघालेल्या जीवन, विवेक व विकास यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर व्हॅन चालक जीवन धुमाळ जागीच ठार झाला. तसेच दुचाकीवर मागे बसलेले विवेक व विकास गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मसूर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर अपघातस्थळी पोलिसांनी जखमींना उपचारासाठी कराड येथे पाठवले. पळून गेलेल्या व्हॅन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, मृत जीवन धुमाळ याच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगा, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे. सिध्दनाथ मंदिराचे सहा महिन्यांपूर्वी देवाच्या सेवेचे साल त्याच्याकडे होते. दुसर्‍याच्या दुकानात काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

COMMENTS