Homeताज्या बातम्यादेश

कुपवाड्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी दहशतवाद्यांकडून घुसखोरीच्या प्

जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा
पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा
समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू

श्रीनगर ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी दहशतवाद्यांकडून घुसखोरीच्या प्रयत्न सातत्याने करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. गुरूवारी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून खात्का करण्यात आला आहे.
दोघेही दोघेही लाइन ऑफ कंट्रोल अर्थात एलओसीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत होते. तंगधार सेक्टरमध्ये कुंपणाच्या पलीकडे दोघांचे मृतदेह पडलेले दिसले. दरम्यान त्यांच्याकडून 2 पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. दोघांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अजूनही चकमक सुरूच आहे. गेल्या महिन्यात 5 एप्रिल रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न करताना एका दहशतवाद्याचा खात्मा झाला होता. यादरम्यान दुसर्‍या बाजूनेही गोळीबार झाला.

COMMENTS