Homeताज्या बातम्यादेश

काश्मीरमध्ये महिलेसह दोन दहशतवाद्यांना अटक

एके-47 सह अनेक शस्त्रे पोलिसांकडून जप्त

श्रीनगर/वृत्तसंस्था ः जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांकडून दहशत पसरवण्यात येत आहे. यासाठी त्यांच्याकडून स्थानिकांची मदत घेण्यात येत आहे. यासाठी

नवे शिक्षण धोरण
एकाच वेळी सात ते आठ वाहनांचा भीषण अपघात ..पहा थरार
आजचे राशीचक्र शनिवार,१८ डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24

श्रीनगर/वृत्तसंस्था ः जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांकडून दहशत पसरवण्यात येत आहे. यासाठी त्यांच्याकडून स्थानिकांची मदत घेण्यात येत आहे. यासाठी दहशतवादी संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर रसद पुरवठा होत असल्याचे समोर आले. शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी आसाम रायफल्स आणि सीआरपीएफच्या मदतीने बांदीपोरा जिल्ह्यात एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका महिलेसह दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर एके-47 सह अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींपैकी एक पाकिस्तानस्थित हँडलर मुश्ताक अहमद मीरच्या संपर्कात होता. दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला 47 लाख रुपयेही मिळाले होते. अहमद मीर 1999 मध्ये पाकिस्तानला गेला होता. तसेच 25 ऑगस्टला एका हायब्रीड दहशतवाद्याची माहिती मिळाली होती. यानंतर परिसरात चौकी करण्यात आली. या चौकीतून एका व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्याला सुरक्षा कर्मचार्‍यांनी पकडले. या व्यक्तीकडून एक पिस्तूल, एक पिस्तुल मॅगझिन, 8 राउंड आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे. शफायत जुबेर असे आरोपीचे नाव आहे. बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जुबेरला 47 लाख रुपये मिळाले होते. 2000 मध्ये कोठीबाग आयईडी स्फोटातही जुबेरचा हात होता. या स्फोटात 12 पोलिसांसह 14 जणांचा मृत्यू झाला होता. 2009 मध्ये लष्कराचे वाहन जाळल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आहे. झुबेरने चौकशीदरम्यान सांगितले की तो मुनिरा बेगम नावाच्या महिलेकडे शस्त्रे घेण्यासाठी जात होता. मुनिरा बेगम ही ठार झालेल्या दहशतवादी युसूफ चौपानची पत्नी आहे. त्यानंतर पोलिसांनी मुनिराकडून 1 एके-47 रायफल, 3 मॅगझिन, 90 गोळ्या आणि एक पेन पिस्तूल जप्त केले. चौकशीदरम्यान मुनिरा दोन वेळा पाकिस्तानात गेल्याचे समोर आले.

COMMENTS