Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात अत्याचार करून दोन बहिणींचा खून

पुणे : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील एका वस्तीत गुरूवारी दोन बहिणींवर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह पाण्य

छतावरील सौर ऊर्जेच्या तब्बल ८११ मेगावॅट विजेची यंत्रणा नेटमिटरींगद्वारे कार्यान्वित
सोन्याच्या दाराला पुन्हा झळाळी
भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या

पुणे : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील एका वस्तीत गुरूवारी दोन बहिणींवर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत भरून ठेवल्याचे गुरूवारी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी परप्रांतीय वेटरला बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही 8 व 9 वर्षांच्या होत्या.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिकी सुनील मकवाने (9) व दुर्वा सुनील मकवाने (8) अशी मृत मुलींची नावे आहेत. त्या एकमेकांच्या सख्ख्या बहिणी आहेत. त्यांचे मृतदेह ते राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर असणार्‍या परप्रांतीय मुलांच्या एका खोलीतील पाण्याच्या टाकीत आढळले. खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील धनराज बारमध्ये काम करणार्‍या एका वेटरने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी जवळपास 50 वर्षीय असून, त्याला गुरुवारी पहाटे 4 च्या सुमारास पोलिसांनी पुण्यातील एका लॉजवरून अटक केली. सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. मुलींच्या आईचे व वेटरचे प्रेमसंबंध होते. त्यातून वेटरने हे कृत्य केल्याचाही अंदाज या प्रकरणी व्यक्त केला जात आहे.

COMMENTS