Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

नागपूर : नागपूर शहरात झालेल्या तुफानी अवकाळी पावसामुळे भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. गोंडवाना चौक जीपी हाइट्स इथे ही दुर्घ

कळमआंबा ग्रामपंचायतने घेतला एकमताने दारूबंदीचा ठराव
अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या एक हजार 901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता
‘मला कुणी समजून घेत नाही’ चिमुकलीनी चिठ्ठी लिहून केली आत्महत्या | LOKNews24

नागपूर : नागपूर शहरात झालेल्या तुफानी अवकाळी पावसामुळे भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. गोंडवाना चौक जीपी हाइट्स इथे ही दुर्घटना घडली. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडेही कोसळली. रात्री शहरातल्या अनेक वस्त्या अंधारात बुडाल्या होत्या. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दळी वाऱ्यासह पावसाचा शहराला जोरदार तडाखा बसला. नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी साडेसातनंतर शहराला वादळी पावसामुळेच हाहाकार उडाला. अचनाक आलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

COMMENTS