Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पावणेदोन लाख नवे मतदार

पुणे ः निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात

वयोवृद्ध व्यक्तींला शेजारच्या कडून बेदम मारहाण
राजकारणातील घराणेशाही
संवादक्रांतीतून डिजिटल क्रांतीच्या दिशेने

पुणे ः निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असून अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जाहीर केली. जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार यादीत 1 लाख 75 हजार 599 मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या 97 हजार 350 पेक्षा अधिक आहे. 18-19 वयोगटातील 45 हजार आणि 20-29 गटातील 65 हजार 984 नवमतदारांची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी जिल्ह्याची मतदारसंख्या 79 लाख 51 हजार 420 होती, तर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाआधी 27 ऑक्टोबर 2023 रोजी 80 लाख 73 हजार 183 होती. प्रशासनाने महिला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सुट्टीच्या दिवशी शिबिराचे आयोजन, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांचा सहभाग, गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार नोंदणीची सुविधा, उद्योगसंस्थांचा सहभाग असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या 81 लाख 27 हजार 19 एवढी झाली आहे.मागील वर्षाच्या तुलनेत पुरुष मतदारांच्या संख्येत 78 हजार 49, तृतीयपंथी मतदार 200, परदेशातील मतदार 57, सैन्य दलातील मतदारांच्या संख्येत 7 ने वाढ झाली आहे. तर दिव्यांग मतदार संख्या 9 हजार 267 आणि 80 वर्षावरील मतदार संख्येत 34 हजार 141 एवढी घट झाली आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीच्या तुलनेत 18-49 या वयोगटातील 1 लाख 41 हजार 299 मतदार वाढले, तर 50 वर्षावरील मतदारांच्या संख्येत 87 हजार 463 एवढी घट झाली आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तृतीयपंथी मतदारांची संख्या 695 ने वाढली आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविणे, प्रक्षेपित लोकसंख्यनुसार विशिष्ट वयोगटातील लोकसंख्येनुसार मतदार नोंदणी करुन घेणे आणि वगळण्याबाबत नियोजन, समाजातील भटक्या व विमुक्त जाती, महिला, तृतीयपंथी व्यक्ती व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या नोंदणीवर भर, मतदार यादी शुध्दीकरणाच्या अनुषंगाने मयत, दुबार स्थलांतरील मतदारांची पडताळणी योग्यरित्या करण्यासाठी मोहिम स्तरावर काम केल्याने अपेक्षित कामगिरी करणे शक्य झाले आहे.

COMMENTS