नांदेड ः नांदेडमध्ये झालेल्या दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. एका अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद

नांदेड ः नांदेडमध्ये झालेल्या दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. एका अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. भानेगाव फाट्याजवळ महामार्गावर रात्री ऑटो आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार झाले. तर तीन जण जखमी झाले आहेत. पंकज भालेराव आणि सुरेश घायडे या दोघांचाअपघातात जागीच मृत्यू झाला आहे. दुसरा अपघात हदगाव ते तामसा रोडवर असलेल्या डोंगरगाव फाट्यावर झाला आहे. भरधाव वेगात आलेली दुचाकी डोंगरगावकडे जाणार्या कारवर आदळली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
COMMENTS