Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिवंडीत इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबई : भिवंडी येथील गौरीपाडा परिसरात शनिवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. या परिसरातील मोठी इमारत अचानक कोसळली. यात दोन जण ठार झाले. तर पाच जण

सलमानकडे रिक्षा चालवण्याचं लायसन्स आहे का? | LOKNews24
दहशतवाद्यांनी वापरलेल्या कारमध्ये सापडली काडतुसे
मुंबईतील हवा ‘अत्यंत वाईट ’

मुंबई : भिवंडी येथील गौरीपाडा परिसरात शनिवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. या परिसरातील मोठी इमारत अचानक कोसळली. यात दोन जण ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी जात बचावकार्य राबवले. यात चौघांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे जुन्या इमारतींचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भिवंडी येथे गौरीपाडा विभागात अनेक जुन्या इमारती आहेत. या इमारती धोकादायक झाल्या आहेत. जी इमारत कोसळली त्या इमारतीला 40 ते 50 वर्ष पूर्ण झाले असून ही इमारत राहण्यायोग्य नव्हती. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर यंत्रमाग कारखाना देखील होता. दरम्यान, ही इमारत धोकादायक असल्याच्या नोटिसा देखील पालिकेने बाजवल्या होत्या. शनिवारी मध्यरात्री अचानक दोन मजली इमारतीच्या मागच्या बाजूचा भाग पूर्णतः कोसळला. इमारतीच्या ढिगार्‍यात अनेक जण अडकले असून त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. अग्निशामक दल आणि एनडीआरएफचे जवान देखील घटनास्थळी आले दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगार्याखाली सहा जण अडकल्याची माहिती असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यातील चार जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले तर दोन जणांचा ढिगार्याखाली दबून मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. तिघांची प्रकृतीस्थिर तर एकाची प्रकृती गंभीर आहे. भिवंडी महानगरपालिका हद्दीत अनेक धोकादायक इमारती आहेत. या इमारतीमध्ये आजही अनेक नागरिक जीव मुठीत घेऊन राहण्यास आहेत. महापालिकेने अशा इमारतीची दखल घेऊन नागरिकांना आताच सुरक्षित स्थळी हलवणे अपेक्षित आहे.

COMMENTS