Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापुरात चार गावठी कट्ट्यांसह दोघे जेरबंद

दीड लाखाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बेलापूर/प्रतिनिधी ःश्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु. येथे विक्री करण्याच्या उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे अवैधरित्या कब्जात बाळगण

अखिल भारतीय जनजागृती अभियानाद्वारे विविध कायद्यांची माहिती
ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक घेऊ नये : ओबीसी काँग्रेसची मागणी
*आरक्षण यासंदर्भात काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; केली ‘ही’ मागणी | LokNews24

बेलापूर/प्रतिनिधी ःश्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु. येथे विक्री करण्याच्या उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे अवैधरित्या कब्जात बाळगणारे दोन आरोपीसह 1 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हेला यश मिळाले असून या कारवाईमुळे बेलापुरात गावठी कट्टे विक्री होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, यांनी पोलिस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके हे जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील इसम नामे दत्तात्रय डहाळे रा. शिर्डी हा त्याचे साथीदारासह गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी बाजारतळ, बेलापूर बुद्रुक ता. श्रीरामपूर येथे येणार आहेत. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ. मनोहर सिताराम गोसावी, पोहेकॉ. दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे, पोहेकॉ. सुरेश माळी, पोहेकॉ. संदीप घोडके, पोना.विशाल दळवी, पोना- शंकर चौधरी, पोना. दिलीप शिंदे, पोना. संदीप चव्हाण पोकों, सागर ससाणे, पोकॉ. रोहित येमुल पोकों. रणजीत जाधव व चा पोहेकॉ. उमांकात गावडे, चापोहेकॉ. अर्जुन बडे अशांनी मिळून वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने बेलापूर बु ता. श्रीरामपूर येथील बाजारतळ येथे जावुन सापळा लावुन थांबलो असता नमुद बातमीप्रमाणे रेकॉर्डवरील इसम नामे दत्तात्रय डहाळे व त्याचे सोबत एक इसम बेलापूर बु॥ बाजार वेशीतून बाजारतळाकडे पायी येतांना दिसल्याने पथकाची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे (1) दत्तात्रय सुरेश डहाळे वय 34 रा. श्रीराम नगर, शिर्डी, ता. राहाता जि. अहमदनगर (2) सुलतान फत्तेमोहमद शेख वय 29 रा. महलगल्ली, बेलापूर बु. ता. श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचे अंगझडतीत एकुण 1 लाख 45 हजार 700 रुपये किमतीचा मुददेमाल त्यात 04 देशी बनावटीचे पिस्टल, 8 जिवंत काडतूसे असा मुद्देमाल वरील नमुद दोन्ही इसमांच्या कब्जात मिळून आला आहे. दत्तात्रय सुरेश डहाळे वय 34 रा. श्रीराम नगर, शिर्डी, ता. राहाता जि. अहमदनगर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी औरंगाबाद जिल्हयात अग्नीशस्त्र सह एक तसेच खुनाचा प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर घटने बाबत पोहेकॉ. मनोहर सिताराम गोसावी नेम. स्थानिक गुन्हा शाखा, अहमदनगर यांनी श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म अ‍ॅक्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

COMMENTS