Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघातात दोघे जखमी

वाशीम ः समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी सकाळी मालवाहू ट्रक व बोलेरो पिकपचा अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले

वसईजवळील अपघातात तिघांचा मृत्यू
सहलीला निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात
अखेर मुलीला शाळेत सोडणे राहूनच गेले…

वाशीम ः समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी सकाळी मालवाहू ट्रक व बोलेरो पिकपचा अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेंदूरजना मोरे येथील ओव्हरब्रिज जवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. तीन वाहनांचा हा विचित्र अपघात झाला. या अपघातात वाहनातील द्राक्ष आणि कांदे महामार्गावर पडले आहेत. बोलेरो पिकअपचे आणि त्यामधील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लासलगावहुन नागपूरकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक सकाळी पलटी झाला.

COMMENTS